Advertisement

मालमत्ता कर थकवणाऱ्या ३,५६४ मालमत्तांवर पालिकेची कारवाई

मालमत्ता कर (property tax) वसुलीसाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) थकबाकीदारांवर कडक कारवाई करत आहे. कर थकवणाऱ्यांच्या वस्तूही पालिकेने जप्त केल्या आहेत. आता पालिकेने मालमत्तांवर अटकावणीची कारवाई सुरू केली आहे.

मालमत्ता कर थकवणाऱ्या ३,५६४ मालमत्तांवर पालिकेची कारवाई
SHARES

मालमत्ता कर (property tax) वसुलीसाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation)  थकबाकीदारांवर कडक कारवाई करत आहे. कर थकवणाऱ्यांच्या वस्तूही पालिकेने जप्त केल्या आहेत. आता पालिकेने मालमत्तांवर अटकावणीची कारवाई सुरू केली आहे. ३ हजार ५६४ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई पालिकेने केली आहे. त्यामुळे या मालमत्ता खरेदी - विक्री करता येणार नाहीत. 

मालमत्ता कराची (property tax) वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पालिकेचे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ५५०० कोटींचा मालमत्ता कर मिळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ३१५४ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतला आहे. त्यानुसार ३,५६४ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करणात आली आहे. त्यामध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, खुली जागा, शासकीय, शैक्षणिक अशा थकबाकीदार मालमत्ता आहेत. परेल, शिवडीमधील सर्वाधिक म्हणजे १४७ मालमत्तांवर तर पूर्व उपनगरातील मुलुंडमधील ४८१ मालमत्तांवर आणि दहिसरमधील ३२९ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही या मालमत्तांनी करांचा भरणा न केल्यास या मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. 

यापूर्वी पालिकेने मालमत्ता कर (property tax) थकवणाऱ्या २६२ मालमत्तांची जलजोडणी तोडली आहे.  आली आहे. यामध्ये शहर भागातील ६४ मालमत्ता आणि पूर्व व पश्चिम उपनगरातील अनुक्रमे १०४ व ९४ मालमत्तांचा समावेश आहे. कुर्ला ‘एल’ विभागात सर्वाधिक ५८ मालमत्तांचे  तर मालाडमधील ३० आणि मुलुंडमधील २६ मालमत्तांचे पाणी तोडण्यात आले आहे.


हेही वाचा -

Coronavirus Update: करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिका घेणार खासगी रुग्णालयांची मदत

मोबाइल न दिल्याच्या रागातून चेंबूरमध्ये पतीने केली पत्नीची हत्या




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा