Advertisement

Coronavirus Update: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिका घेणार खासगी रुग्णालयांची मदत

कोरोनामुळे मुंबई महापालिकेने (BMC) खबरदारीचा उपाय म्हणून विविध रुग्णांलयांमध्ये ३९० आयसोलेटेड बेड्स (isolated beds) राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus Update: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिका घेणार खासगी रुग्णालयांची मदत
SHARES

भारतात कोरोना व्हायरसची (Coronavirus Update) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून संशयीत रुग्णांच्या संख्येतही भर पडू लागली आहे. याकडे पाहता मुंबई महापालिकेने (BMC) खबरदारीचा उपाय म्हणून विविध रुग्णांलयांमध्ये ३९० खाटांचा आयसोलेटेड वाॅर्ड(isolated beds) राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या उपक्रमात खासगी रुग्णालयांची (Private hospitals)  देखील मदत घेतली जाणार आहे. रविवारी केरळ आणि तामिळनाडूत कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यावर देशात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. 

हेही वाचा- Coronavirus Update: मुंबईत करोनाचा संशयीत रुग्ण? हिंदुजा रुग्णालयाचा नकार

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी (bmc additional commissioner suresh kankani) यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या (bmc health department) तयारीची माहिती दिली. ते म्हणाले, सध्या कोरोनाची लागणी झालेल्या किंवा संशयीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. तिथं २८ खाटांची सुविधा आहे. परंतु या वाढत्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी खाटांची संख्या ३९० वर नेण्याचा महापालिकेचा विचार आहे. यासाठी नुकतीच मुंबईतील खासगी रुग्णालयांसोबत (Private hospitals) एक बैठक घेण्यात आली. मुंबईतील १० ते १२ रुग्णालयांत १६० खाटांची सुविधा होऊ शकते. तर महापालिकेच्या इतर रुग्णालयांत १०० खाटा आणि कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) १३० खाटांची सुविधा हाेऊ शकते.  

आपत्कालीन परिस्थितीत या खाटा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे निर्देश सर्वच रुग्णालयांना देण्यात आले आहेत. सध्या करोनाचे (Coronavirus) सगळे संशयीत रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात येत असल्याने तेथील घाटांची संख्या ६० वर नेण्यात येत आहेत. त्यात आणखी वाढ करून खाटांची संख्या १३० वर नेण्यात येईल. अंधेरीतील महापालिकेच्या सेव्हन हिल्स (seven hills hospital) रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. सुरूवातीला या ठिकाणी ४०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर ही संख्या वाढवून ९०० वर नेण्यात येईल.

हेही वाचा- मेट्रोनंतर रेल्वे-एसटी करोनासाठी सज्ज

आतापर्यंत कोरोनाच्या १२८ संशयीत रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार करण्यात आले आहेत. परंतु या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ४० डाॅक्टरांची टीम कार्यरत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका मुंबईला (Mumbai) नसला तरी सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिक तोंडाला मास्क लावत आहेत तसंच, हात सॅनिटायझरनं स्वच्छ करत आहेत. त्यामुुळं मास्क (Mask) आणि सॅनिटायझरची (Sanitizer) मागणी अचानक वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवढा निर्माण झाल्यानं औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) यांची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा