Advertisement

उच्च वर्गीयांची 'मंदी'तही चांदी, मुंबईत विकला ६६ कोटींचा एक फ्लॅट

मुंबईत लक्झरी अपार्टमेंटची विक्री चांगली झाली आहे. असं असलं तरी सर्व सामान्यांच्या दृष्टीनं घरांची किंमत चढीच आहे.

उच्च वर्गीयांची 'मंदी'तही चांदी, मुंबईत विकला ६६ कोटींचा एक फ्लॅट
SHARES

बांधकाम उद्योगावर मंदीचं सावट आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला वाईट दिवस आहेत. फ्लॅट रिकामे पडून आहेत. विकले जात नाहीत, भाव पडले आहेत. अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण मुंबईत लक्झरी अपार्टमेंटची विक्री चांगली झाली आहे. असं असलं तरी सर्व सामान्यांच्या दृष्टीनं घरांची किंमत चढीच आहे. सर्व सामान्यांना परवडतील अशी घरं उपलब्ध झाली तर मंदीचं सावट खऱ्या अर्थानं हटलं असं म्हणता येईल


इतके विकले फ्लॅट

मुंबईमध्ये गेल्या ६ महिन्यांत तब्बल १८०० कोटींना ६३ सुपर लक्झरी फ्लॅट विकले गेले आहेत. शिवाय आलिशान, अत्याधुनिक सुविधा असलेली बिझनेस प्रॉपर्टीसुद्धा चढ्या भावात विकली गेली आहे


सर्वात महागडी मालमत्ता

दक्षिण आणि मध्य मुंबईत गेल्या सहा महिन्यात लक्झरी अपार्टमेंटची विक्री झाली, त्याबद्दलचा रिपोर्ट टाइम्स ऑफ इंडियानं छापला आहे. या रिपोर्टनुसार, मुंबईत लोअर परळमधली एक ९२०० चौरस फुटांची जागा तब्बल ७८.३ कोटींना विकली गेली. ही मुंबईतली सर्वात महागडी मालमत्ता समजली जात आहे. इंडियाबुल्स ब्लू कॉम्प्लेक्समधला ही दुमजली प्रॉपर्टी विक्रमी भावात विकली गेली आहे.


हा भाग सर्वांत महाग

याशिवाय ब्रीच कँडी क्लबजवळ बिशप्स गेट इथं ५ बेडरूमचे डुप्लेक्स फ्लॅट तब्बल ६६ कोटींना एक या दरानं विकले गेले आहेत. त्याखालोखाल वरळी भागात ५५ कोटींना एक या दरानं पाच फ्लॅट विकले गेले आहेत. ओबेरॉय रिअॅल्टीजच्या ३६० वेस्ट नावाच्या आलिशान रेसिडेन्शिअल टॉवरमध्ये हे पाच फ्लॅट ५५ कोटींच्या दरात विकले गेले आहेत.


देशात अशा प्रकारच्या सुखसोयींनी सज्ज आलिशान घरांसाठी मुंबई हेच मोठं मार्केट असल्याचं मानलं जातं. पण केवळ उच्च वर्गीयांसाठी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आर्थिक मंदीचा किंवा बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा या हायएंड प्रॉपर्टीच्या विक्रीत फारसा परिणाम दिसत नाही, असं म्हणायला हवं.



हेही वाचा

Women’s Day Special: घरखरेदीत महिला आघाडीवर, मुंबईला देतात प्राधान्य!

बीडीडी चाळींचा पुनर्विकास पर्यावरणपूरक पद्धतीने होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा