Advertisement

अग्निशमन दलाच्या जवानांना मिळणार नवा गणवेश


अग्निशमन दलाच्या जवानांना मिळणार नवा गणवेश
SHARES

अग्निशमन दलातील सर्व कार्यरत जवान व अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाच्या पुरवठ्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर या जवानांना कपडा देऊन शिलाईची रक्कम देण्यात यायची. परंतु आता पुन्हा एकदा जवान व अधिकाऱ्यांना शिवलेला गणवेश देण्यात येणार आहे. पुढील २ वर्षांसाठी त्यांना हा गणवेश देण्यात येणार आहे.


तीन वर्षे गणवेशापासून वंचित

मुंबई अग्निशमन दलाच्या जवान व अधिकाऱ्यांच्या गणवेश खरेदीबाबत वाद निर्माण झाल्यानंतर या जवानांना गणवेशाऐवजी कपडा उपलब्ध करून देत त्यांना शिलाई भत्ता देण्याचा निर्णय तत्कालिन महापालिका आयुक्तांनी दिला होता. सन २००९-१० मध्ये गणवेश खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बाब समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल तीन वर्षे जवान व अधिकारी गणवेषांपासून वंचित होते.


अडीच वर्षांनी शिलाई भत्ता

त्यामुळे सन २०१४-१५ मध्ये प्रथम रेमंडचा कपडा उपलब्ध करून देत त्यासाठी शिलाई भत्ताही देण्यात आला होता. परंतु त्यानंतर सन २०१५-१६ मध्ये जवान व अधिकाऱ्यांना केवळ गणवेशाचा कपडा दिला. मात्र त्यांना शिलाई भत्ता देण्यात आला नव्हता. परंतु आता २ ते अडीच वर्षांनी हा शिलाई भत्ता जवान व अधिकाऱ्यांच्या पगारात जमा होणार आहे.


किती शिलाई भत्ता?

हा शिलाई भत्ता कमीत कमी २५४१ रुपयांपासून ५७५३ रुपयांपर्यंत एवढा आहे. अग्निशमन दलात त्यावेळी कार्यरत असलेल्या २३१३ जवान व अधिकाऱ्यांना हा शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

या सर्व जवान व अधिकाऱ्यांसाठी सुमारे ६४ लाख रुपये एवढा शिलाई भत्ता देण्यास स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर ही रक्कम जवान व अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र पुढील दोन वर्षांसाठी नवीन रेडीमेड गणवेश जवान व अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळत आहे.



हेही वाचा-

मुंबईच्या अग्निशमन विभागात 97 महिलांची निवड

मुंबईत आता कंटेनरमध्ये अग्निशमन दलाचा कारभार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा