Advertisement

गोरेगावमधील इमारतीला भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गोरेगावमधील इमारतीला भीषण आग, 6 जणांचा मृत्यू
Representing photo
SHARES

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत  4 जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे. तर 14  जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.

गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती.  ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे तर 14 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला  आणि सात पुरुषांचा समावेश आहे.

जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा