Advertisement

मुंबईकरांचा मतदानासाठी उत्साह


मुंबईकरांचा मतदानासाठी उत्साह
SHARES

मुंबई - मुंबईत सकाळी 7.30 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालीय. अनेक मतदान केंद्रावर सकाळापासूनच गर्दी पाहायला मिळतेय. मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर न पडता टीव्ही बघत बसायचे असा तरुणांचा कल असतो. अशा तरुणांना चपराक देणारे दृश्य वांद्रयातील सेंट पिटर स्कूलमध्ये दिसून आले. 70 वर्षांच्या आजी आजोबांपासून ते 92 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. मतदानासाठी बाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन ज्येष्ठांनी केले आहे. बांद्रा पश्चिमेकडील सेंट पिटर स्कूलमध्ये 92 वर्षांच्या आजीबाईंनी मतदान केले. लुसी गोम्स असे आजीचे नाव आहे.


 

वांद्रेतल्या सेंट पिटर स्कूलमध्ये 78 वर्षांच्या आजीबाई मात्र मतदान न करताच परतल्या. कारण मतदान केंद्र सापडत नसल्याने त्यांना मतदान न करता परतावे लागले. पेटलींन वेसावकर असं या आजींचे नाव आहे.

 

 


मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी दोन हजार 275 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदानाचा निकाल 23 तारखेला म्हणजेच गुरुवारी लागणार आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. यंदाची निवडणूक शिवसेना आणि मनसे या स्थानिक पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी

संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ

227 प्रभागांसाठी 2,275 उमेदवार रिंगणात

7 हजार 304 मतदान केंद्र, 45 हजार कर्मचारी, अधिकारी तैनात

मुंबईत सुरक्षेसाठी दंगल नियंत्रण पथकाच्या दहा तुकड्या तैनात

 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा