शेतकरी आंदोलनाचा मुंबईवर परिणाम नाही

  Mumbai
  शेतकरी आंदोलनाचा मुंबईवर परिणाम नाही
  मुंबई  -  

  राज्यात आजपासून शेतकरी 7 दिवस संपावर आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये शेतकरी आंदोलनाचा प्रभाव आहे. पण याचा परिणाम मुंबईत मात्र दिसत नाही. गुरुवारी सकाळी दूध, भाजीपाला रोजच्या सारखा मुंबईकराना मिळाला. मुंबईत दूध आणि भाजीपाला नवी मुंबईच्या दूध संकलन केंद्र तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधून पुरवठा होत असतो. मात्र मुंबईत रोजच्या प्रमाणे पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांच्या संपाचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. भाजी बाजारात सरासरी 400 ते 500 गाड्या शेतमाल येतो. गुरुवारी देखील बाजारात 400 ते 425 गाड्या बाजारात आल्या. शिवाय बुधवारचा माल देखील शिल्लक असल्याने गुरुवारी मालाचा तुटवडा जाणवला नाही. एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांनी ही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र हे आंदोलन असेच सुरू राहिले तर पुढच्या दोन दिवसांत मुंबईकरांच्या जीवणावर परिणाम होऊ शकतो.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.