Advertisement

मुंबईतील प्रसिद्ध हँगिग गार्डन 7 वर्षांसाठी बंद होण्याची शक्यता

मुंबई पालिकेने शहरातील पायाभूत सुविधा हाती घेतल्या आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध हँगिग गार्डन 7 वर्षांसाठी बंद होण्याची शक्यता
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ हँगिंग गार्डन तब्बल ७ वर्षांसाठी बंद होण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेने शहरातील पायाभूत सुविधा हाती घेतल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे गार्डन बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मलबार हिलवरील टेरेस गार्डन म्हणजेच  हँगिग गार्डनच्या खाली असलेल्या वसाहतकालीन जलाशयाची पुनर्बांधणी करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे.

मलाबार हिल जलाशयाची दुरुस्ती आणि विस्तारासाठी हँगिग गार्डनमध्ये खोदकाम करण्यात येणार आहे. परंतु, पाणी साठवण्यासाठी जवळपास 90 दक्षलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधून पर्यायी मार्ग सापडत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यात येणार नाही, असं पालिकेने म्हटलं आहे. 

येत्या सात वर्षांच्या कालावधीत जलायश पाडून पुनर्बांधणी करण्याची योजना आहे, अशी माहिती महापालिकेची अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी दिली. काम सुरू करण्याआधी लगतच्या भूखंडावरील सुमारे 350 झाडे तोडणे आणि पुनर्रोपण करण्याव्यतिरिक्त संपूर्ण लँडस्केप क्षेत्र वेगळे करणे आवश्यक आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

बीएमसीच्या जल बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर सर्व परवानग्या मिळाल्या तर नोव्हेंबर 2023 पर्यंत काम सुरू करण्यात येईल.



हेही वाचा

अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन

महाराष्ट्रात 13 ऐतिहासिक शाळा विकसित केल्या जाणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा