Advertisement

अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन

मुंबईकरांनो सावधान! BMC ने दिल्या महत्त्वाच्या सुचना

अनंत चतुर्दशीला 'या' वेळेत करू नका चौपाट्यांवर विसर्जन
SHARES

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी (दिनांक २८ सप्टेंबर २०२३) समुद्रात सकाळी ११ वाजता ४.५६ मीटरची भरती,  सायंकाळी ५.०८ वाजता ०.७३ मीटरची ओहोटी, रात्री ११.२४ वाजता ४.४८ मीटर उंचीची भरती असेल. 

यानंतर, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे ५.१५ मिनिटांनी ०.५६ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती,  सायंकाळी ५.४९ वाजता ०.३६ मीटरची ओहोटी असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४६८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६४ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १५० निर्माल्य कलशांसह २८२ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.  

अनंत चतुर्दशी दिनी सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! हवामान विभागाकडून येलो अलर्ट जाहीर

महाराष्ट्रात 13 ऐतिहासिक शाळा विकसित केल्या जाणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा