Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! हवामान विभागाकडून येलो अलर्ट जाहीर

शनिवारी, 23 सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या संततधार पावसाने नागपुरात अंबाझरी तलाव आणि नाग नदी दुथडी भरून वाहू लागली आणि शहरातील अनेक भागात पूर आला.

मुंबईकरांनो लक्ष द्या! हवामान विभागाकडून येलो अलर्ट जाहीर
SHARES

भारतीय हवामान खात्याने (IMD)  सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये विभागातील नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा यांचा समावेश आहे.

27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागाने पुणे, नाशिक, अमरावती आणि इतर सात जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

शनिवारी, 23 सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या संततधार पावसाने नागपुरात अंबाझरी तलाव आणि नाग नदी दुथडी भरून वाहू लागली आणि शहरातील अनेक भागात पूर आला.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, तीन तासांच्या अल्प कालावधीत नागपूरमध्ये 109 मिमीच्या जोरदार पावसाने पूरस्थिती निर्माण केली.

जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार किमान 10,000 घरे आणि मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आस्थापना प्रभावित झाल्या आहेत. रविवारी, 24 सप्टेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकार्‍यांनी नागपूरच्या मुख्यालय उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्रातील भारतीय लष्कराच्या पूर मदत स्तंभांची मागणी केली होती.

पूर बचाव कार्यासाठी अंबाझरी परिसरात अभियंता उपकरणे आणि बोटीसह भारतीय सैन्याच्या दोन स्तंभ तैनात करण्यात आले होते. भारतीय सैन्याने सर्व वयोगटातील सुमारे 40 लोकांची सुटका केली आणि त्यांना वैद्यकीय मदतही दिली.

पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्र सरकारने घरांसाठी 10,000 आणि व्यावसायिक आस्थापनांना 50,000 ची भरपाई जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकांना मदतीचे आश्वासन दिले.



हेही वाचा

मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबरला देखभालीसाठी बंद

भारताची शाही ट्रेन डेक्कन ओडिसी तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा