Advertisement

KDMCची अवैध फेरीवाल्यांविरोधात मोहीम

कल्याण-डोंबिवली मनपानं (KDMC) घोषणा केली आहे की, ते १ नोव्हेंबरपासून कल्याणमधील पदपथांवरील सर्व अवैध अतिक्रमणे हटवत आहेत.

KDMCची अवैध फेरीवाल्यांविरोधात मोहीम
SHARES

कल्याण-डोंबिवली मनपानं (KDMC) घोषणा केली आहे की, ते १ नोव्हेंबरपासून कल्याणमधील पदपथांवरील सर्व अवैध अतिक्रमणे हटवत आहेत. फेरीवाले, बेकायदा स्टॉल्स तसंच पदपथांवर अस्तित्त्वात असलेल्या दुकानांचे विस्तारित भाग हटवणं या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम १५ दिवस चालणार आहे.

केडीएमसी यावर्षी फेब्रुवारीपासूनच अशा प्रकारच्या कामात गुंतलं आहे. परंतु अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानं लॉकडाऊन कालावधीत पुन्हा ही अवैध अतिक्रमणे उघडकीस आली आहेत. COVID 19 चा परिणाम म्हणून भारत सरकारनं देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे क्लिनअप मोहीम अचानक थांबवावी लागली.

KDMCचे आयुक्त विजय सूर्यवंशी म्हणाले की, “पादचाऱ्यांना मोकळेपणानं चालण्यासाठी बनवलेले फुटपाथ बहुधा बेकायदा अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत. मोहिमेच्या अगोदर आम्ही फुटपाथवरून अतिक्रमण हटवण्याआधी दुकानदार आणि गृहनिर्माण संस्थांना कळवलं आहे.”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की लॉकडाऊन दरम्यान देखील प्रशासनाला मूलभूत पायाभूत सुविधा संबंधित कामे करण्यास परवानगी होती. तथापि, हे बहुतेक एजन्सीद्वारे मान्सूनपूर्व कामांपुरते मर्यादित होते. तसंच मलेरिया आणि टायफाइडसारख्या इतर आजारांच्या जोखीमवर नियंत्रण आहे याची खात्री करून घेत आहे.

डॉक्टरांना COVID 19 आणि मलेरया अशी दोन्ही लक्षणं असणारे रुग्ण देखील सापडले आहेत. या रुग्णांची संख्या जास्त नाही. पण अतिसंवेदनशील रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकते.



हेही वाचा

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा बोनस

ऊर्जामंत्र्यांनी दिली टाटा वीज निर्मिती केंद्राला भेट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा