Advertisement

ऊर्जामंत्र्यांनी दिली टाटा वीज निर्मिती केंद्राला भेट

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवार २ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

ऊर्जामंत्र्यांनी दिली टाटा वीज निर्मिती केंद्राला भेट
SHARES

टाटा वीज निर्मिती केंद्राने आयलँडिंगच्या काळात मुंबईला वीज पुरवठा न केल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवार २ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी भविष्यात वीज निर्मिती उत्पादन वाढवणं आणि पारेषण यंत्रणा मजबूत करण्यासाठी टाटा समूह करीत असलेल्या नियोजनाचा आढावाही घेतला. 

टाटा वीज कंपनीच्या अंतर्गत असलेली मुंबईची आयलँडिंग यंत्रणा १२ ऑक्टोबरला मुंबईला बाहेरून येणारा वीजपुरवठा बाधित झाल्यावर सुरू होणं अपेक्षित होती. परंतु तसं न झाल्याने मुंबईत काही तास वीज खंडित होऊन त्याचा अत्यावश्यक सेवा, उद्योगधंदे आणि सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता. याची गंभीर दखल घेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांना भेट देत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांनी राज्य भार प्रेषण केंद्र आणि खारघर येथील महापारेषण केंद्र इथं प्रत्यक्ष भेट देऊन वीज ठप्प होण्यामागील कारणे समजून घेतली होती. (maharashtra energy minister nitin raut visits tata power station at trombay mumbai)

हेही वाचा- चुका झाल्या असतील, तर कबूल करा, ऊर्जामंत्र्यांनी टाटाला खडसावलं

एवढंच नाही, तर दोषींवर कठोर कारवाईचे संकेत देखील ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईला बाहेरून होणारा वीज पुरवठा बंद झाल्यावर अतिरिक्त वीज पुरवठा करणं ही टाटा पाॅवरची जबाबदारी असताना चुका लपवल्या जात आहेत का? चुका झाल्या असतील, तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा, अशा शब्दांत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवरला खडसावलं होतं.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या चारपैकी तीन ४०० केव्ही लाईन बंद पडल्याने आणि चौथी लाईन अतिरिक्त भार आल्यामुळे बंद करावी लागली तसंच त्याचवेळी आयलँडिंग यंत्रणा सुरू होणं अपेक्षित असताना ती सुरू न झाल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता. भार प्रेषणामध्ये एसएलडीसीची मोलाची भूमिका असते. त्याअनुषंगाने त्या दिवशीचा घटनाक्रम आणि एसएलडीसीचं कामकाज कसं चालते याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी टाटा पाॅवरच्या अधिकाऱ्यांकडून समजावून घेतली होती.

हेही वाचा- महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन टाका ‘ऑप्टिकल फायबर’- ऊर्जामंत्री नितीन राऊत


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा