Advertisement

मुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर

रविवार ते गुरुवार पर्यंतचे कामकाजाचे तास नेहमीप्रमाणे असतील जे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत असतील.

मुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर
SHARES

सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोवंडी शाखेने 1 डिसेंबरपासून रविवारच्या  साप्ताहिक सुट्टीत बदलली केला आहे. आता रविवारची सुट्टी शुक्रवारी केली आहे. 

याबाबतची नोटीस या आठवड्यात शाखेच्या आवाराबाहेर लावण्यात आली होती आणि गोवंडीच्या ईशान्य उपनगरात आणि आसपास राहणाऱ्या स्थानिक अल्पसंख्याक लोकसंख्येला सोयीसुविधा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नोटीसनुसार, 1 डिसेंबरपासून, SBI गोवंडी शाखा महिन्यातील सर्व शुक्रवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहणार आहे. 

रविवार ते गुरुवार पर्यंतचे कामकाजाचे तास नेहमीप्रमाणे असतील जे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत असतील.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा