Advertisement

मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

मागील ४-५ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ
SHARES

मागील ४-५ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा पाणी साठा हळूहळू वाढत आहे. सध्या झालेल्या पावसामुळे मुंबईत जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील दीड महिना तरी मुंबईकरांची पाण्यासाठीची चिंता मिटली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या सात धरणांचा समावेश होते. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. सततच्या पावसामुळे तलावांमध्ये एकूण एक लाख ८५ हजार ९८१ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली आहे.

गेल्या ४ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लीटर)

  • मोडकसागर- ४३,३९३
  • तानसा – १८,८२७
  • मध्य वैतरणा – २६,६७६
  • भातसा – ८१,६८४
  • विहार – १४,१७६
  • तुळशी – ४,२१७

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट दिला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला गेला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा