हा खरा इम्पॅक्ट

 MHADA Colony
हा खरा इम्पॅक्ट

दहिसर - ‘मुंबई लाइव्ह’ने दाखवलेल्या बातमीनंतर पालिकेने दहिसर (पू) इथला कचरा उचलला आहे. गेल्या एक महिन्यापासून शांतीनगर परिसरात कचरा तसाच पडून होता. तिथल्या रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार करूनही हा कचरा उचलला जात नव्हता. मात्र ‘मुंबई लाइव्ह’ने 22 फेब्रुवारीला ही बातमी दाखवल्यानंतर पालिकेने 24 फेब्रुवारीला हा कचरा उचलला. याच परिसरात काही अंतरावर सरदार वल्लभभाई शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पालिकेने इथला कचरा उचलल्याने इथल्या रहिवाशांनी ‘मुंबई लाइव्ह’चे आभार मानले आहेत.

Loading Comments