मुंबई लाईव्हच्या दणक्यानंतर पालिकेला जाग


मुंबई लाईव्हच्या दणक्यानंतर पालिकेला जाग
SHARES

वांद्रे - मुंबई लाईव्हाच्या बातमीच्या दणक्यानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आली. मुंबई लाईव्हनं वांद्रे स्टेशनरोडवरील गटाराचं झाकण चोरी झाल्याची बातमी दाखवली होती. झाकण चोरी होऊनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचंही मुंबई लाईव्हन दाखवलं होतं. मुंबई लाईव्हच्या याच वृत्ताची दखल घेत काँक्रीटीकरण करत गटाराचं झाकण पुन्हा लावण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. पालिकेचा कंत्राटदार दीपेश जैन यानं ही माहिती दिलीय. या गटाराचं काम 1 ते 2 महिन्यात पुर्ण होणार असल्यातही जैन यांनी सांगितलं. काँक्रेट टाकून झाकण फिट केल्यास पुन्हा असे चोरीचे प्रकार घडणार नाहीत यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

संबंधित विषय