'मुंबई लाइव्ह'च्या बातमीचा दणका

  मुंबई  -  

  मुंबई - म्हाडातील भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश मुंबई लाइव्हनं सोमवारी म्हाडाच्या घरघोटाळ्याचा पर्दाफाश या वृत्ताद्वारे केलं. त्यानंतर म्हाडात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची म्हाडाच्या मुंबई मंडळानं गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी आता लवकरच गुन्हा दाखल होणार आहे.

  दलाल आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी गिरणी कामगारांच्या घरांचा बाजार मांडलाय. याचा पर्दाफाश स्टिंग ऑपरेशनद्वारे मुंबई लाइव्हनं समोर आणलं. त्यानंतर लागलीच मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे आणि लाखे यांची बुधवारी गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाने भेट घेतली त्यावेळी लाखे यांनी ही माहिती दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.