Advertisement

Mumbai Local : हार्बर मार्गानं लवकरच गाठा बोरिवली!

बोरिवली-पनवेल थेट लोकल सुरू झाल्यास त्याचाही प्रवाशांना फायदा होणार आहे.

Mumbai Local : हार्बर मार्गानं लवकरच गाठा बोरिवली!
SHARES

हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत होणार आहे. त्यामुळे लवकरच हार्बर मार्गावरुन आता बोरिवलीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे.

हार्बर मार्गावर अंधेरी आणि त्यानंतर गोरेगावपर्यंत गाड्या चालवल्यानंतर हार्बरचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडून MUTP-3A अंतर्गत हे काम केले जाणार आहे. सध्या हार्बर मार्गावर सीएमटी ते पनवेल, सीएमटी ते अंधेरी आणि गोरेगाव दरम्यान लोकल धावतात. 

एप्रिल, 2023 ते मार्च, 2024  य आर्थिक वर्ष पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान प्रवासी संख्येत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हार्बरच्या विस्ताराला गती देण्यासाठी गोरेगाव ते मालाड (2 किमी) आणि मालाड ते बोरिवली (6 किमी) असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव अशी हार्बर लोकल धावत आहे.

तर गोरेगाव ते मालाड हा पहिला टप्पा 2026-27 पर्यंत आणि मालाड ते बोरिवली हा दुसरा टप्पा 2027-28 पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी 825 रुपये कोटी खर्च असून मे महिन्यात निविदा काढून जूनच्या आधी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.

तसेच बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. यामध्ये भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, बाधिच बांधकामे आणि झाडांचे ड्रोन सर्वेक्षण यांचा समावेश आहे. 



हेही वाचा

आता पावसाळ्यातही मुंबई लोकलचा प्रवास होणार सुरळीत

घडाळ्यासारखे परिधान करा मेट्रोचे तिकिट!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा