Advertisement

मुंबईत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जम्बो सुविधा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारकडून जम्बो सुविधांची निर्मिती केली जात आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जम्बो सुविधा
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारकडून जम्बो सुविधांची निर्मिती केली जात आहे. मुंबईत बीकेसी, गोरेगाव, महालक्ष्मी या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी सोय करण्यात आली आहे.मुंबई महापालिकेकडून रोज 7 लाख अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली आहेत. तर मुंबईत 360 फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. 

ह्या आहेत मुंबईत जम्बो सुविधा

1. वांद्रे कुर्ला संकुलात एमएमआरडीने 15 दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल उभारले आहे. यात 1000 बेड्सची जम्बो सुविधा तसेच 200 बेड्सची आयसीयू सुविधा आहे.

2. महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम  युद्धपातळीवर सुरु आहे. यात 600 बेड्सची सुविधा असून यात 125 बेड हे आयसीयू वॉर्डसाठी असतील.  मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवलं जाईल.

3. नेस्को गोरेगाव येथे 535 बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत.

4. रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे 7000 पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील 2 आठवड्यात सुरू होणार आहे.

5. 31 मे पर्यंत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, बांद्रा, नेसको, गोरेगाव अशा मिळून 2475 खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत आहेत.

6. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 100 खाटा आणि 20 आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली गेली आहे.

7. स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी 30 हजार खाटा क्षमतेच्या कोविड केअर सेंटरची व्यवस्था

8. मुंबईतील खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी खाटा उपलब्ध आहेत ते लगेच कळेल. खाटांचा डाटा रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये प्रत्येक बेडला युनिक आयडी. डिस्चार्ज धोरणाची कडक अंमलबजावणी.

9. रुग्णालयांची स्वच्छता, जेवण व इतर अनुषंगिक बाबींतून डीन यांची जबाबदारी कमी केली. आरोग्य उपचारांवर अधिक लक्ष देता येणे शक्य.

10. रुग्णवाहिका 100 वरुन 450 वर. या सेवेसाठी देखील मोबाईल अॅप.

11. केईएम, नायर, सायन, जेजे, सेंट जॉर्ज आणि बीएमसी रुग्णालये यांची जबाबदारी 5 आयएएस अधिकाऱ्यांकडे. प्रत्येक रुग्णालयात वॉर रुम, सीसीटीव्ही बसवले.



हेही वाचा -

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा