Advertisement

मलबार हिल रस्ता सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला होणार

5 ऑगस्ट 2020 रोजी मलबार हिल येथे भूस्खलनानंतर हा रस्ता बंद करण्यात आला होता.

मलबार हिल रस्ता सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला होणार
SHARES

अडीच वर्षांनंतर मलबार हिल इथला बीजी खेर रोड आठवडाभरात पुन्हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी मलबार हिल येथे भूस्खलनानंतर हा रस्ता बंद करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांना आशा आहे की, रस्ता खुला झाल्यानंतर मलबार हिलमधील वाहतूक कोंडी कमी होईल.

अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू म्हणाले की, बीजी खेर रोड एका आठवड्यात वाहतुकीसाठी खुला केला जाईल. रस्त्याच्या दुरुस्तीला इतका वेळ का लागला याचे कारण स्पष्ट करताना, पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्याखालील मुख्य पाण्याची पाईपलाईन बदलण्यात आली होती आणि स्टॉर्मवॉटर ड्रेनसारखे इतर  बदल देखील करण्यात आले आहेत.

“तांत्रिक सल्लागार समितीने दोन पावसाळे थांबण्याची सूचना केली होती. आम्ही तीन पावसाळे वाट पाहिली. 2020 नंतर भूस्खलन न झाल्याने आम्ही हा रस्ता डांबरी ऐवजी सिमेंट काँक्रीटने दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला,” अधिकारी म्हणाला. 1 किमीपेक्षा जास्त लांब मार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जाते.

मलबार हिल इथले माजी नगरसेवक प्रमोद मांद्रेकर म्हणाले, मलबार हिलमधील रहिवाशांसाठी हा रस्ता अतिशय उपयुक्त आहे. तो बंद असल्याने त्यांना वाळकेश्वर रोड, नेपेनसी रोड आणि एन.एस.पाटणकर रोडचा वापर करावा लागतो त्यामुळे अवजड वाहतूक होते. खेर रस्ता खुला झाल्यास या तिन्ही रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल.

“खेर रोडला डोंगर उतार असल्यामुळे आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे यांच्या देखरेखीखाली मातीची तपासणी केली. यासाठी अधिक वेळ लागला. आम्ही एक संरक्षक भिंत देखील बांधली,” असे बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेकडून 15 जानेवारीला 2 विशेष लोकल

मुंबईतल्या मोठ्या संकुलांमध्ये आता मियावाकी वने बंधनकारक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा