Advertisement

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेकडून 15 जानेवारीला 2 विशेष लोकल

रेल्वेने 'या' स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेकडून 15 जानेवारीला 2 विशेष लोकल
SHARES

जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही मॅरेथॉन होणार आहे. यासाठी रेल्वेने स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.

येत्या रविवारी होणाऱ्या TATA मुंबई मॅरेथॉन 2023 साठी पश्चिम रेल्वेने 15 जानेवारीच्या पहाटे दोन अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे या मार्गांवर गाड्या धावतील.


गाडी क्रमांक BO 90004 बोरिवली ते चर्चगेट जी बोरिवलीहून 03.50 वाजता सुटेल. ती रविवारी बोरिवली स्थानकावरून 5 मिनिटे लवकर म्हणजेच 03.50 ऐवजी 03.45 वाजता सुटेल.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हॉटेल ट्रायडंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन नोंदणी शुभारंभाची घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या. तथापि, सध्या जनजीवन पूर्वपदावर आल्याने मोठ्या कालावधीनंतर, सर्व स्पर्धकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मॅरेथॉन 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना आता या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेत 50 हजारांहून अधिक हौशी तसेच व्यावसायिक धावपटू जगभरातून सहभागी होतील, ही स्पर्धा अधिक आकर्षक होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वांना एकाच मंचावर आणण्याठी मॅरेथॉन हे एक उत्तम माध्यम आहे. सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रीटी, लोकप्रतिनिधी देखील या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवतील, अशी आशा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.



हेही वाचा

मुंबईतल्या मोठ्या संकुलांमध्ये आता मियावाकी वने बंधनकारक

एसी लोकलचे दार न उघडल्याने प्रवासी संतप्त, मोटरमनला केलं केबिनमध्ये बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा