Advertisement

गोरेगाव : आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण ही आग लावली की लागली? अशा चर्चांना उधाण आले आहे.

गोरेगाव : आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
SHARES

गोरेगाव पूर्वेकडील इन्फिनिटी आयटी पार्कमागील घनदाट जंगलात भीषण आग लागली  आहे. ही टेकडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असल्याची माहिती आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात बिबट्या, मोर, हरीण, माकड आणि डुक्कर यांच्यासह विविध प्रकारचे कीटक, पक्षी आणि वनस्पती जीवनासह विविध प्रकारचे लहान मोठे वन्यजीव आहेत.

आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस विभाग, अग्निशमन दल आणि एमएफबी आणि वन व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही लेव्हल-01 आग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जंगलातील एका टेकडीवर आग लागल्याचे लक्षात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.हेही वाचा

राज्य सरकारचा स्टॅम्प ड्युटीबाबत मोठा निर्णय, आता इतकं भरावं लागणार शुल्क

दादर स्टेशनवर आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा