Advertisement

दिलासादायक! मुंबई १०० टक्के अनलॉक होणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लावण्यात आलेले निर्बंध लवकरच हटवण्यात येणार असून मुंबई पुन्हा अनलॉक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दिलासादायक! मुंबई १०० टक्के अनलॉक होणार?
SHARES

मागील २ वर्षांहून अधिक काळ कोरोनाच्या त्रासानं त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लावण्यात आलेले निर्बंध लवकरच हटवण्यात येणार असून मुंबई पुन्हा अनलॉक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकमत या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेनं निर्बंधातून सूट देण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असून, आसपासच्या शहरांमधील परिस्थितीदेखील नियंत्रणात राहिल्यास आम्ही कोविड टास्क फोर्सशी संवाद साधू. त्यानंतर सध्या लागू असलेले थोडे निर्बंधदेखील शिथिल होतील. पुढील आठवड्यापर्यंत निर्बंध हटवण्याची परवानगी मिळेल, असंही काकाणी यांनी सांगितलं.

मुंबईतील कोरोना परिस्थितीची माहिती टास्क फोर्ससमोर ठेवू. त्यावर अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या पाहता फेब्रुवारीत मुंबई अनलॉक होऊ शकते. मात्र यानंतरही मुंबईकरांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं लागेल, असंही काकाणी म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा