Advertisement

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापौर बनल्या नर्स

कोरोनाचा सामना करण्यासाठी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आता नर्स बनणार आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापौर बनल्या नर्स
SHARES

कोरोनाचा सामना करण्यासाठी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आता नर्स बनणार आहेत. सोमवारी परिचारिकेचा गणवेश परिधान करून त्या नायर रुग्णालयात गेल्या. त्यांनी  100 पेक्षा जास्त नर्सिंगच्या विद्यार्थिनींना कोरोनाच्या काळात काम करत असताना स्वतःची काळजी कशी घ्याल यावर लेक्चर दिले. त्यांचं मनोबल कसं उंचावेल यासाठी त्यांनी विदयार्थीनीना मार्गदर्शन केले. 19 वर्षानंतर किशोरी पेडणेकर यांनी परिचारिकेचा गणवेश परिधान केला.

 महापाैर किशोरी पेडणेकर पूर्वी परिचारिका होत्या. 1991 त्यांनी नोकरी सोडली आणि त्या राजकारणात आल्या. परिचारिका म्हणून काम करत असतानाही शिवसेनेच्या महिला शाखेमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. म्हणूनच 1991 पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या.किशोरी पेडणेकर यांचा अनेक पत्रकारांशी आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी, सामाजिक संस्थांशी संपर्क आला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा निकाल येइपर्यंत त्यांनी स्वतःला महापौर बंगल्यात विलगीकरण करून घेतले होते. विलगीकरणातून बाहेर येत असताना त्यांनी आपला जुनाच पण तरीही नव्याने धारण केलेला अवतार घ्यायचे ठरवले आहे.

मुंबईच्या महापौर आणि जुन्या परिचारिका अशा दुहेरी भूमिकांतून त्या हा संवाद साधणार आहेत.  अनेक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स नर्स वॉर्डबॉय यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झालं आहे. अशाच लोकांना एक भावनिक आधार देण्यासाठी मुंबईच्या महापौर सरसावल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांची संवाद साधणार आहेत. परिचारिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. सोबतच परिचारिकांना वाटणारी भीती कमी करण्यासाठी त्या मार्गदर्शनही करणार आहेत.


हेही वाचा -

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा खास आराखडा

Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा