Advertisement

मृतदेहाच्या नावाखाली गलिच्छ राजकारण – किशोरी पेडणेकर

काही राजकारणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे फोटो व व्हीडीओ वायरल करत गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

मृतदेहाच्या नावाखाली गलिच्छ राजकारण – किशोरी पेडणेकर
SHARES

कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्या रुग्णाचे नातेवाईक शव घेण्यासाठी वेळेवर येत नसल्याने ते शव काही काळ रुग्णालयातच असतात. परंतु काही राजकारणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे फोटो व व्हीडीओ वायरल करत गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

महापौर म्हणाल्या की, पालिका रुग्णालयातील प्रत्येकजण कोरोना रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु काही कोरोनाग्रस्तांना आधीच काही आजार असल्याने ते प्रभावीपणे कोरोनाचा सामना करु शकत नाही आणि त्यात त्या रुग्णाचा मृत्यू होतो. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह स्ट्रेचर अथवा बेडवरच ठेवण्यात येतो. तो मृतदेह जमिनीवर अथवा कुठेही ठेवला जात नाही. विशेष म्हणजे आतापर्यंत कोरोना मृतदेहाचे जेवढे व्हीडीओ व फोटो वायरल करण्यात आले त्या मृतदेहाशेजारी असणारा रुग्ण ठणठणीत असून त्याच्या मनात कसलीही भीती दिसून येत नाही. फक्त अन् फक्त राजकारण करायचे म्हणून हे सगळे सुरु आहे.

पालिका रुग्णालयात विविध आजारांचे हजारो रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. कोरोना आजार येण्याआधी 5 ते 10 रुग्ण दिवसाला दगावत होते. आता कोरोनामुळे रुग्ण दगावण्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयांवर ताण येत आहे. परंतु कोरोना मृतदेहाच्या नावाखाली राजकारण करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे राजकारण करण्यात येत आहे. यातून पालिका रुग्णालयांना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे.



हेही वाचा -

'या' 5 वॉर्डमध्ये 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

पालिकेची नवी रणनिती, एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा घेणार शोध




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा