Advertisement

मुंबईत अंशत: लॉकडाऊन; महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून सतत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाऊनच्या दिशेनं पळत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

मुंबईत अंशत: लॉकडाऊन; महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत
SHARES

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून सतत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाऊनच्या दिशेनं पळत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एकूण परिस्थिती लक्षात घेत मुंबईत अंशत: लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

मुंबईत जानेवारी महिन्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागला होता. मात्र, मास्कविना फिरणारे नागरिक, सामाजिक अंतराच्या नियमांना हरताळ अशा विविध कारणांमुळे फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मागील २ दिवस नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं मुंबईत अंशत: लॉकडाऊन करावे लागेल, असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी धार्मिक स्थळे, बाजारपेठा, उपनगरीय लोकल यांवर निर्बंध घालावे लागतील. याबाबत मुख्यमंत्री लवकरच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा