Advertisement

मेट्रो लाईन 2A आणि 7 मुंबईकरांच्या सेवेत डिसेंबरपासून दाखल होण्याची शक्यता

दोन्ही मार्गांचे काम ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे.

मेट्रो लाईन 2A आणि 7 मुंबईकरांच्या सेवेत डिसेंबरपासून दाखल होण्याची शक्यता
SHARES

पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुंबई मेट्रो लाइन 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) आणि लिंक रोड ते लाईन 2A (दहिसर डीएन नगर) या बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्याची चाचणी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दावा केला आहे की, दोन्ही मार्गावरील काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत व्यावसायिक कामकाजाचा उर्वरित भाग सुरू करण्याचे लक्ष्य आहे.

याशिवाय, एमएमआरडीए मेट्रो लाईन 7 वरील गोरेगाव स्थानकावर एक फूट ओव्हरब्रिजचीही योजना करत आहे. ज्यामुळे तो पश्चिम उपनगरातील रेल्वे स्थानकाशी जोडला जाईल.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMOCL), जी ऑपरेशन्स आणि मेंटेनन्सची (O AND M) काळजी घेते, त्यांनी दररोज सरासरी 30,000 रायडर्सची नोंदणी केली आहे. 20 किमी अंतराचा पहिला टप्पा यावर्षी एप्रिलपासून कार्यान्वित झाला. आंशिक भागात 18 स्थानके आहेत.

संपूर्ण दोन मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर दररोज सुमारे 3 लाख प्रवासी प्रवास करू शकतात. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये 30 स्थानके असतील.

याशिवाय, नवीन मेट्रो लाईन 2A आणि 7 देखील DN नगर स्टेशनवर घाटकोपर आणि वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या विद्यमान मेट्रो वनशी जोडली जाईल. यासाठी लवकरच एमएमआरडीएकडून निविदा काढण्यात येणार आहेत.



हेही वाचा

एसी लोकलविरोधात प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे प्रशासनाकडे केली 'ही' मागणी

"एसी लोकलपेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा, अन्यथा...", जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा