Advertisement

बंगळुरूहून मानवरहित मेट्रो कोचेस मुंबईत दाखल


बंगळुरूहून मानवरहित मेट्रो कोचेस मुंबईत दाखल
SHARES

मुंबईतील मेट्रोच्या कामांना गती मिळाली आहे. काही मेट्रो प्रकल्प अद्याप अडथळ्यांना सामोरे जात असले तरी, मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ या मार्गिकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारीत महिन्यात या दोन्ही मार्गांवर मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. त्यासाठी बुधवारी रात्री बंगळुरूहून मानवरहित मेट्रो कोचेस मुंबईत दाखल झाले.

एमएमआरडीने याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. मे २०२१ पासून मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ ची सेवा सुरु करण्याचा मानस असल्याची एकनाथ शिंदे यांनी नुकतेच स्पष्ट केलं होते. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंगळुरूला जाऊन मेट्रो कोचेसची पाहणीही केली होती. त्यानंतर हे कोचेस मुंबईत आणण्यात आले आहेत.

  • दहिसर-अंधेरी (मेट्रो-७) आणि दहिसर-डी एन नगर (मेट्रो २ ए) या मार्गिकांसाठी ट्रायल रन होणार आहे.
  • फेब्रुवारीत ट्रायल रनला सुरुवात होईल.
  • एकूण ५७६ कोचेस टप्प्याटप्याने मुंबईत दाखल होतील.
  • या दोन्ही मार्गावरची मेट्रो ड्रायव्हरलेस असेल.
  • सुरूवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल.
  • अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू होईल.

भारतातच मेट्रो कोचेसची बांधणी होत असल्यामुळे प्रत्येक कोचमागे दोन कोटी रुपयांची बचत झाली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा