Advertisement

मुंबईतील डासांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी पालिका गटार आणि नालेसफाई करत आहे.

मुंबईतील डासांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी
SHARES

मुंबईच्या (mumbai) उपनगरांमध्ये डासांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात क्युलेक्स डास (Mosquitoes) ही प्रजाती एक मोठी समस्या बनली आहे. गेल्या काही आठवड्यात ही समस्या आणखी बिकट झाली आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

क्युलेक्स प्रजाती जगभरातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या डासांच्या प्रजातीमध्ये येते. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी पालिका गटार आणि नालेसफाई करत आहे.

आरे मिल्क कॉलनी आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सारखे क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित आहेत. अनेक उंच इमारतींमध्ये, डास आत येऊ नयेत म्हणून लोकांना संध्याकाळी खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. रहिवाशांचे म्हणणे आहे की, औषधांची फवारणी आणि धुरीकरण याचा डासांवर कुठलाच परिणाम होत नाही आहे.

अनेक नागरिक यासाठी बांधकाम क्षेत्र आणि त्याच्यापासून निर्माण झालेला कचरा याला जबाबदार धरत आहेत. तसेच साचलेले पाणी आणि कचरा यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. 

काहींना डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये (disease) वाढ होण्याची चिंता आहे. रहिवासी अतिरिक्त खबरदारी घेत आहेत, परंतु समस्या जैसे थे आहे.

 


हेही वाचा

जुहू येथे पाळीव प्राण्यांसाठी 'पेट पार्क' ची स्थापना

मुंबईत 13 वर्षाच्या मुलीला जीबीएसची लागण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा