Advertisement

काेरोनाबाधित मृतदेहाचा व्हि़डीओ प्रसारित करू नका, पालिकेचं आवाहन

रुग्णालयात दिवसरात्र झटणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती पालिकेने व्यक्त केली आहे.

काेरोनाबाधित मृतदेहाचा व्हि़डीओ प्रसारित करू नका, पालिकेचं आवाहन
SHARES

मागील आठवड्यात मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांशेजारीच इतर काेरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंंतर रुग्णालय प्रशासनावर मोठी टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर आता कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृतदेहाचा व्हिडीओ (चित्रफित) प्रसारित करू नये, असं आवाहन मुंबई पालिकेनं केलं आहे. या चित्रफितींचा रुग्णालयात दिवसरात्र झटणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती पालिकेने व्यक्त केली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे दिवस-रात्र रुग्णसेवा करीत आहेत. पालिकेच्या इतर खात्यांचेही कर्मचारीही अविरतपणे सेवा देत आहेत. मात्र, घटनेची कारणमीमांसा समजून न घेता रुग्णालयातील मृतदेहांचा व्हिडीओ प्रसारित झाला. ही बाब रात्रंदिवस काम करत असणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबलाचे खच्चीकरण आहे, असं मत पालिकेने व्यक्त केलं आहे. या अशा प्रकारांबाबत संबंधितांना काळजी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले असून यंत्रणेकडून तशी सतर्कता बाळगण्यात येत असल्याचंही पालिकेने स्पष्ट केलं आहे.

वैद्यकीय उपचारांदरम्यान काही रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतर निर्धारित प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी जातो. संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची अंतिम नोंद घेतल्यानंतर संबंधित मृतदेह वेष्टनात बंद गुंडाळला जातो. तसेच मृत्यूची कल्पना त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. काही वेळा नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यात वेळ होतो. अडचणी उद्भवल्या नाहीत तरी सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह देण्यास किमान १ तासांचा वेळ जातो. मृतदेहामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तो उपचार सुरू असलेल्या खाटेवरच ठेवणे आवश्यक असते.  ही प्रक्रिया राबवित असताना रुग्णालय योग्य ती खबरदारी घेत असल्याचंही पालिकने म्हटलं आहे. 



हेही वाचा -

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा