Advertisement

स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये मुंबई महापालिका नापास

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा घेतली जाते. या वर्षीपासून त्यात कचरामुक्त शहरांसाठी मानांकनाचा समावेश केला गेला.

स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये मुंबई महापालिका नापास
SHARES
Advertisement

स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये मुंबई महापालिकेला नापास करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईच्या पंचतारांकित श्रेणीसाठी प्रयत्न करणाऱ्या पालिकेला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई शहराची स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत गेल्या दोन वर्षांमध्ये घसरण होताना दिसून आले आहे. गेल्या वर्षी या अभियानात 49 या क्रमांकावर फेकल्या गेल्यानंतर पालिका प्रशासनाने गेले वर्षभर मुंबई अनेक उपक्रम राबवले यामध्ये घराघरातून कचरा गोळा करणे ओला व सुका कचरा यावर प्रक्रिया अशा उपक्रमांचा समावेश होता.

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा घेतली जाते. या वर्षीपासून त्यात कचरामुक्त शहरांसाठी मानांकनाचा समावेश केला गेला. फाइव्ह स्टार, थ्री स्टार आणि वन स्टार अशा तीन स्वरूपात त्याची वर्गवारी करण्यात आली होती. देशभरातील चौदाशेहून अधिक शहरांनी विविध वर्गवारीनुसार प्रस्ताव पाठविले होते.

यावर्षी मुंबई महापालिकेने पंचतारांकित रेटिंगसाठी अर्जही केला होता. मात्र 19 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात मुंबईला शून्य रेटिंग देण्यात आले. यावर तीव्र आक्षेप घेत पालिका प्रशासनाने केंद्रातील गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या सह सचिवांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राने नियुक्त केलेल्या थर्ड पार्टी एजन्सी च्या पथकाने 19 ते 27 डिसेंबर 2019 मध्ये मुंबईत पाहणी केली होती.

गेल्या वर्षी थ्री स्टार रँकिंग न मिळाल्यामुळे स्वच्छता सर्वेक्षण 2020 साठी पालिकेने अथक प्रयत्न करून पंचतारांकित रेटिंगसाठी अर्ज केला होता. मात्र केंद्राने जाहीर केलेल्या निकालात दोनवेळा मुंबईतील सर्व सार्वजनिक ठिकाणी झाडू मारण्याच्या निकषामध्ये मुंबईला नापास करण्यात आले आहे. एम पश्चिम येथील रस्ता अस्वच्छ असल्याचे छायाचित्र जोडून पालिकेला शून्य रेटिंग देण्यात आले आहे. हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना
संबंधित विषय
Advertisement