Advertisement

रस्त्यावर थुंकल्यास आता 1 हजार रुपयांचा दंड

मुंबई महापालिकेने रस्त्यावर थुंकल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम 1 हजार रुपये केली आहे.

रस्त्यावर थुंकल्यास आता 1 हजार रुपयांचा दंड
SHARES

मुंबईत रस्त्यावर थुंकल्यास आता 1 हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिका रस्त्यावर थुंकल्यास मोठा दंड आकारणार आहे. यापूर्वी रस्त्यावर थुंकल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येत होता. हा दंड आता पाचपटीनं वाढवला आहे. 

कोरोनाशी लढण्यासाठी आता सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. थुंकीवाटे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने रस्त्यावर थुंकल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम 1 हजार रुपये केली आहे. याशिवाय पालिकने 4 खासगी हाॅटेल्समध्ये विलीगीकरण कक्षही सुरू केला आहे. रेल्वेनेही कोरोनाचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना केल्या आहेत.  स्थानकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्मचं तिकीटही १० रुपयांवरुन ५० रुपये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने मंगळवारी घेतला. मुंबईसह, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या विभागीय रेल्वे कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले आहेत. तर रेल्वेने आतापर्यंत 76 एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत.

देशात करोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे.  ५७०० पेक्षा अधिक लोकांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. सैन्यामध्ये देखील करोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी एका ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. देशातला करोनाग्रस्ताचा हा तिसरा मृत्यू आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा