Advertisement

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ११६ झाडे कापणार, वृक्षप्राधिकरणची मंजुरी


बाबासाहेबांच्या स्मारकासाठी ११६ झाडे कापणार, वृक्षप्राधिकरणची मंजुरी
SHARES

दादर पश्चिम येथील इंडिया युनीट मिल नं ६ अर्थात इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या बांधकामात अडसर ठरणारी झाडे कापण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देत ११६ काढण्यास परवानगी दिली गेली.  

एका बाजुला मेट्रो रेल्वेच्या आड येणारी झाडे कापण्यावरून राजकारण केलं जात असताना बाबासाहेबांच्या स्मारकाच्या जागेतील झाडे कापण्यास केवळ मतांचे दान लक्षात घेऊन मंजुरी दिली का असा सवाल आता उपस्थित होत आहे.


विरोध नाही

दादर पश्चिम येथील वीर सावरकर मार्गावर असलेल्या इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. त्यामुळे या भू क्रमांक ३२४ वर एमएमआरडीएच्या माध्यमातून स्मारकाच्या बांधकामात अडसर ठरणाऱ्या ११६ झाडे काढण्याची परवानगी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणापुढे मागितली होती. यामध्ये ११६ झाडांपैकी ७९ झाडे कापली जाणार आहे तर ३७ झाडे पुनर्रोपित करण्यास परवानगी मागितली होती. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी वृक्षप्राधिकरण समितीपुढे मंजुरीला आला असता कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी याला विरोध न करता तो मंजूर करण्यासाठी आग्रह धरला.


प्रक्रिया योग्य राबवावी

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा मंजुर करण्यात यावा, अशी विनंती करताना यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेणारे वास्तूविशारदाचे प्रमाणपत्र जोडलेले नाही. त्यामुळे यासाठी असलेली प्रक्रिया योग्य प्रकारे राबवावी. जेणेकरून कोणतीही एनजीओ न्यायालयात गेल्यास महापालिकेचं काम थांबलं जाणार नाही याची काळजी घेतली जावी, अशी विनंती केली. यावर भाजपाचे हरिष भांद्रिग्रे तसेच काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी यांनीही हा प्रस्ताव मंजुर करण्याची विनंती केल्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्षांनी हा प्रस्ताव संमत केला.

साडेबारा एकरवर स्मारक

इंदू मिलची जागा मार्च २०१७मध्ये राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. एकूण साडेबारा एकर जमिनीवर हे स्मारक उभारलं जाणार आहे. ११.४ एकर जमिन ही स्मारकासाठी राखीव असून ६.४ एकर जागा ही सीआरझेडच्या बाहेर आहे. तर ६ एकर जागा ही सीआरझेडमध्ये आहे.



हेही वाचा - 

रेल्वे - पालिका अधिकाऱ्यांची महिन्याला होणार बैठक

सर्व शाळा इंटरनेट-वायफायने जोडणार - शिक्षणमंत्री




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा