Advertisement

रेल्वे-पालिका अधिकाऱ्यांची महिन्याला होणार बैठक


रेल्वे-पालिका अधिकाऱ्यांची महिन्याला होणार बैठक
SHARES

महापालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्यामध्ये अधिक चांगलं समन्वयन नियमितपणे साधलं जावं, या उद्देशाने आता दर महिन्याला ठराविक दिवशी नियमितपणे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अभियंता व संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित राहतील आणि महापालिका व रेल्वेच्या यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयन साधण्याच्या प्रयत्न करतील, अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.

विशेष बैठक संपन्न

अंधेरी येथील पुल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अभियंता हे विशेषत्वाने उपस्थित होते.

महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे संचालक विनोद चिठोरे, पूल खात्याचे प्रमुख अभियंता शीतलाप्रसाद कोरी हे देखील उपस्थित होते. बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्यामध्ये अधिक प्रभावी समन्वयन साधण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


पुलांचे अाॅडीट शुक्रवारपासून

 मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी, एफओबी, स्काय-वॉक इत्यादी प्रकारचे ४४५ पूल आहेत. या पूलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल अाॅडीट) उद्या शुक्रवारपासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी एकूण १२ टीम तयार करण्यात अाल्या अाहेत.  या टीममध्ये भारतीय प्रोद्योगिकी संस्था (आयआयटी, मुंबई) येथील तज्ज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व महापालिकेच्याही तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे. 

पुलांची संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत, त्यांची संरचनात्मक तपासणी अगोदर करण्यात येणार आहे. यामध्ये लोकमान्य टिळक पूल, एल्फिन्स्टन पूल अादी पुलांचा समावेश असेल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं



हेही वाचा - 

यंदाही प्रवेशाचा गोंधळ होणार?

बीएससी सेमिस्टर ६चा निकाल जाहीर




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा