Advertisement

कर बुडव्यांच्या घरांसमोर पालिकेने वाजवले ढोलताशे

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) मालमत्ता कर (Property tax) थकबाकीदारांनी खजील होऊन कर भरावा यासाठी आता नवीन शक्कल लढवली आहे.

कर बुडव्यांच्या घरांसमोर पालिकेने वाजवले ढोलताशे
SHARES

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) मालमत्ता कर (Property tax) थकबाकीदारांनी खजील होऊन कर भरावा यासाठी आता नवीन शक्कल लढवली आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांसमोर पालिकेचे कर्मचारी ढोलताशे वाजवत आहेत. याशिवाय मालमत्ता कर न भरणाऱ्या इमारतींचं पाणीही कापण्यात आलं आहे. आतापर्यंत  लोकांकडे १५,००० कोटींचा मालमत्ता कर थकलेला आहे. 

यंदा पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) करनिर्धारण विभागाची वसुली घटली आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी केवळ ३ हजार कोटी रुपयांची वसुली झाली आहे.  या वर्षी मालमत्ता करवसुलीसाठी ५१०० कोटी रुपयांचं लक्ष्य ठेवलं होतं. पालिका ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती करत आहे. रस्त्यांवरून दवंडी पिटल्याप्रमाणे ध्वनिक्षेपकावरून प्रत्येक ठिकाणी जाऊन मालमत्ता कर  (Property tax) भरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मालमत्ता कर भरणं तुमची कायदेशीरच नव्हे तर नैतिक जबाबदारीही आहे, कर भराल तरच स्वच्छता, पाणी आणि दर्जेदार रोडही तुम्हाला मिळतील, तुम्ही वेळेवर मालमत्ता कर भरला तर तुमच्या दारात ढोलताशे वाजणार नाहीत, असं या माइकवरून सांगितलं जात आहे. 

 मालमत्ता कर (Property tax) वसूल करण्यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावर हे अभियान सुरू केलं आहे. पालिकेने वॉर्डातील मालमत्ता कर चुकविणाऱ्यांची यादी तयार केली आहे. ही यादी संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. त्यामुळे पालिका अधिकारी ही यादी पाहून मालमत्ता धारकांच्या घर आणि कार्यालयासमोर महापालिकेने ढोलताशे वाजवण्यास सुरुवात केली आहे. ढोलताशे वाजवल्यानंतर माइकवरून मालमत्ता कर भरण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. पालिकेचे ४ लाख मालमत्ताधारक असून त्यांच्याकडून पालिकेला दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो.



हेही वाचा -

मेट्रो स्टेशनबाहेर भाड्याने सायकल मिळणार, प्रतितास २ रुपये दर

विना FASTag लेनमध्ये घुसले, २० कोटीची वसुली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा