Advertisement

रेस्टॉरंट, क्लबवर मुंबई महापालिकेच्या धाडी

मुंबई महापालिकेने कोरोना नियमावली जारी केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र ,अनेक ठिकाणी महापालिकेच्या आदेशाचे पालन होत नसल्याचं दिसून आलं आहे.

रेस्टॉरंट, क्लबवर मुंबई महापालिकेच्या धाडी
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई महापालिकेने कोरोना नियमावली जारी केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र ,अनेक ठिकाणी महापालिकेच्या आदेशाचे पालन होत नसल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई महापालिकेने आता नियम व आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी रात्री महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धडक कारवाई केली.वांद्रे पश्चिम परिसरातील पाली हिल येथील आयरिश हाऊस , खार येथील यू टर्न स्पोटर्स बार, कर्तार पिल्लर बार ऍण्ड रेस्टॉरंट,'१४५ कॅफे' आणि पब या रेस्टॉरंट व क्लबवर शनिवारी रात्री धाडी टाकल्या.

 यावेळी कोविड संदर्भात महापालिकेने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले जात असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. बांद्रा वेस्ट बारमध्येही १०० पेक्षा अधिक लोक तर विनामास्क असल्याचं आढळलं. तर  '१४५ कॅफे' आणि पबमध्ये २५० जण जमल्याचे दिसून आले.  

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महापालिकेने आयरिश हाऊसकडून  ३० हजार, यू टर्न स्पोर्ट्स बारला २० हजार, कर्तार पिल्लर बार ऍण्ड रेस्टॉरंटला ३० हजार, तर बांद्रा वेस्ट बारला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर '१४५ कॅफे' च्या चालकावर  ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसंच कॅफेच्या व्यवस्थापकाविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.हेही वाचा -

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाईRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा