Advertisement

कोरोनाबाबत सर्व मदतीसाठी 'या' हेल्पलाईनवर करा संपर्क

मुंबईतील नागरिकांना कोरोनाबाबत सर्व माहिती आता एकाच क्रमांकावर मिळणार आहे.

कोरोनाबाबत सर्व मदतीसाठी 'या' हेल्पलाईनवर करा संपर्क
SHARES

मुंबईतील नागरिकांना कोरोनाबाबत सर्व माहिती आता एकाच क्रमांकावर मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिकने १९१६ हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. या नंबरवर कोरोना पेशंटसाठी नजीकच्या कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत या माहितीसह डाॅक्टरांचं टेलिफोनिक मार्गदर्शनही मिळणार आहे.

१९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून ३ क्रमांक निवडल्यास कोरोना रुग्णांसाठी जवळच्या कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत याबाबत तात्काळ माहिती मिळणार आहे. तर, १ क्रमांक निवडल्यास कोरोनाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळेल. या मार्गदर्शनादरम्यान डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय चाचणी गरजेची आहे असे वाटल्यास, त्यांना त्यांच्या घराजवळच्या वैद्यकीय प्रयोगशाळेचा संपर्क क्रमांक देण्यात येतो. ज्या व्यक्तींना रुग्णवाहिकेची गरज आहे, त्यांनी २ पर्याय निवडल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोनाव्यतिरिक्त पालिकेशी संबंधित नागरी सेवा सुविधासाठी नंबर ४ हा पर्याय निवडावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर कोरोनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन, त्यांचे शंकेचे निरसन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. त्याचबरोबर आता रुग्णालयांची माहिती देण्याची सुविधाही पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.



हेही वाचा -

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा खास आराखडा

Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा