Advertisement

‘त्या’ व्हिडिओवरून पालिकेला बदनाम करणाऱ्याविरोधात होणार गुन्हा दाखल

कोरोना रुग्ण जिवंत असतानाही त्याला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेल्याचा दावा एका व्हिडीओतून करण्यात आला होता.

‘त्या’ व्हिडिओवरून पालिकेला बदनाम करणाऱ्याविरोधात होणार गुन्हा दाखल
SHARES

कोरोना रुग्ण जिवंत असतानाही त्याला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेल्याचा दावा एका व्हिडीओतून करण्यात आला होता. हा व्हिडीओ शेअर करताना संबंधितानं मुंबई महापालिकेचा उल्लेख केला. यावरून मुंबई महापालिकेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

यासंदर्भात इक्बालसिंग चहल यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, हा मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सुरेश नाखुआ यांना फोन करतोय पण ते फोन घेत नाहीत. आम्ही त्यांना ट्वीट केलेल्या व्हिडीओबद्दल विचारतो आहोत, मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. आम्ही आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहोत.

एका जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला कोरोना किटमध्ये बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं. स्मशानभूमीत आणल्यानंतर तो रुग्ण जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. याबाबत सुरेश नाखुआ यांनी एक ट्वीट केलंय. “हे धक्कादायक आहे. एक जिवंत माणूस बीएमसीने स्मशानभूमीत नेला. मला वाटतं की # महावसुली आघाडी सरकारचं स्मशानभूमीतून काही महावसुलीचं टार्गेट असेल,” असं सुरेश नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

नाखुआ यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवरुन त्याला उत्तर देण्यात आलंय. “सर, आपल्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानुसार आम्ही तुम्हाला विनंती केली की, या व्हिडीओचं मूळ आणि सत्यता तपासून पाहा. मात्र, तुम्हालाही या व्हिडीओचं मूळ स्थान आणि सत्यतेबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तुमच्याकडून माहितीची वाट पाहत आहोत. त्यानंतर याबाबत पुढील कारवाईचा विचार केला जाईल” असं ट्वीट मुंबई महापालिकेनं केलं आहे.



हेही वाचा

जीवंत कोरोना रुग्णाला अंत्यसंस्कारासाठी नेलं? भाजपाच्या आरोपावर पालिकेचं ट्विटर वॉर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा