Advertisement

बीेएमसीकडून मालमत्ता कर देयके आता ई-मेलवर

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची बिले पाठवण्यात विलंब होत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांपर्यंत ही बिले अद्यापही पोहोचलेली नाहीत. परिणामी कर वसुलीमध्ये अडचणी येत आहेत.

बीेएमसीकडून मालमत्ता कर देयके आता ई-मेलवर
SHARES

मुंबई महापालिकेकडून आता मालमत्ता कराची देयके ई-मेलवर पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी करदात्यांनी पालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी अर्जामध्ये आपली आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची बिले पाठवण्यात विलंब होत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांपर्यंत ही बिले अद्यापही पोहोचलेली नाहीत. परिणामी कर वसुलीमध्ये अडचणी येत आहेत. मालमत्ता कराची देयके ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने करदात्यांच्या  नोंदणीकृत इ-मेलवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

केवायसी अद्ययावत केल्यानंतर मालमत्ता करासंबंधीची सूचना ई-मेल आणि एसएमएसद्वारे करदात्यांना पाठवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे महानगरपालिका प्रशासनासह करदात्यांनाही मोठा फायदा होणार आहे. करदात्यांना मालमत्‍ता कर देयके वेळेत प्राप्‍त होतील. यामुळे वेळेवर करभरणा होऊन दंडाची कारवाई टाळता येईल.

तसंच महानगरपालिकेच्‍या विविध योजनांची माहिती नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे व नोंदणीकृत ई-मेलद्वारे मिळेल. भविष्‍यातील मालमत्‍ता कराविषयक योजनेची माहिती वेळेत मिळेल. त्याचप्रमाणे करदात्यांच्या मालमत्तेत झालेल्‍या दुरुस्‍तीमुळे सुधारित देयके त्‍वरित उपलब्‍ध होतील.

जानेवारीच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत १२०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर मिळाला आहे. त्यामुळे पुढील अडीच महिन्यांमध्ये ५२०० कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्याचे आव्हान करनिर्धारण व संकलन विभागासमोर आहे. हेही वाचा -

आस्थापना पाठोपाठ सोसायट्यांना सीसीटीव्ही बंधनकारक

जे.जे. रुग्णालयात दिवसभरात १०० पैकी केवळ १३ जण लसीकरणास हजर
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा