Advertisement

संबंधित विषयाची 'माहिती' महापालिका देणार ऑनलाइन

महापालिकेनं ही सुविधा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित विषयाची 'माहिती' महापालिका देणार ऑनलाइन
SHARES

एखाद्या विषयासंबंधी माहिती मिळवण्यासाठी महापालिकेच्या संबंधित सरकारी कार्यालयात लेखी अर्ज करावा लागतो. त्यावरील उत्तरवजा माहिती वैयक्तिक किंवा टपालाद्वारे संबंधित अर्जदाराला पाठवली जाते. माहिती अधिकार कायदा २००५ नुसार संबंधित माहिती १ महिन्यात देण्याचा कायदा असला, तरी अनेकदा दिलेल्या मुदतीत माहिती मिळत नाही. त्यामुळं काही वेळा माहिती मिळण्यात तांत्रिक अडथळे, तर काही वेळा माहिती दडवण्याचे प्रकार घडत असतात. यामध्ये अर्जदाराला सरकारी कार्यालयातील चकरा आणि नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळं आता महापालिकेनं ही सुविधा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या ऑनलाईन करण्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्याचा अर्ज देण्यासाठी किंवा लिखित उत्तरे घेण्यासाठी यापुढे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे घालण्याची गरज लागणार नाही. महापालिका आता लवकरच ही सेवा ऑनलाइन सुरू करणार आहे. त्यामुळं घरबसल्या ही माहिती मिळू शकणार आहे.

नागरिकांना जलद वेळेत माहिती मिळण्यासाठी ही यंत्रणा ऑनलाइन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते करत आहेत.  राज्य सरकार वगळता अद्याप अन्य सरकारी यंत्रणेत ऑनलाइन माहिती देण्यात येत नाही. मुंबई महपालिका ऑनलाइन सेवा कधी सुरू करणार, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी माहिती मागितली होती. याबाबत महापालिकेने दिलेल्या उत्तरात 'ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची पूर्तता माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पूर्ण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या यंत्रणेसाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर काही वाॅर्डात प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर मुंबईतील सर्वच वाॅर्डात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा