Advertisement

मुंबईत 15 मार्च ते 24 एप्रिलपर्यंत पाणीकपात जाहीर, वाचा सविस्तर

नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबईत 15 मार्च ते 24 एप्रिलपर्यंत पाणीकपात जाहीर, वाचा सविस्तर
SHARES

BMC ने 15 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत शहर आणि उपनगरात 5% पाणीकपात जाहीर केली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील जलाशयाची पातळी कमी होत चालली आहे. तसेच भांडुप येथील वॉटर फिल्टरेशन प्लांटमध्ये सुरू असलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

BMC शहराला दररोज 3,900 दशलक्ष लिटर पाणी (MLD) पुरवते, जे भांडुप कॉम्प्लेक्स आणि पिसे येथील फिल्टरेशन प्लांटमध्ये शुद्ध केले जाते. 2,810 MLD क्षमतेचा हा आशियातील सर्वात मोठा ट्रीटमेंट प्लांट आहे. भांडुप येथे सुमारे 1,910 MLD आणि 900 MLD फिल्टर करू शकणारी दोन युनिट्स आहेत.

एका अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, फिल्टरेशन प्लांटमधील अवाढव्य टाक्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करणे आवश्यक आहे आणि या कामासाठी जवळपास एक महिना लागणार आहे.

दरम्यान, सात तलावांमध्ये 37% इतका गंभीर साठा आहे, जो गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. राज्य सरकारने आधीच BMC ला अप्पर वैतरणा आणि भातसा येथून 15% पर्यंत अतिरिक्त साठा वापरण्याची परवानगी दिली आहे.

पिसे पंपिंग स्टेशनवरील तीन ट्रान्सफॉर्मर आगीच्या घटनेत जळून खाक झाल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मुंबईकरांना आठवडाभराच्या 15% पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. पण पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर बीएमसीने पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला होता. हेही वाचा

मुंबईला लवकरच न्यूयॉर्क लंडनप्रमाणे सेंट्रल पार्क मिळणार

भाईंदरजवळील समुद्रात जेलिफिशचे आक्रमण, मच्छिमार चिंतेत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा