Advertisement

'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' मुंबईकरांच्या सेवेत

जाणून घ्या काय आहे सुविधा?

'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' मुंबईकरांच्या सेवेत
SHARES

नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' (8169681697) चा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महापालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाईन' कार्यान्वित झाली आहे.

नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रीज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.

दरम्यान, मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हाटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदवता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासात त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' भागात पूरस्थिती रोखण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना

श्रीकांत शिंदे यांची कोळीवाड्याच्या पुनर्विकासाबाबत पालिकेशी चर्चा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा