Advertisement

मुंबईच्या कांदिवलीत इंडस्ट्रिअल इस्टेटला भीषण आग


मुंबईच्या कांदिवलीत इंडस्ट्रिअल इस्टेटला भीषण आग
SHARES

कांदिवलीतल्या अशोकनगरमध्ये बोनेंझा इंडस्ट्रिअल इस्टेटला भीषण आग लागली. या दोन मजली इमारतीला सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान ही आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांसह पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

बोनेंझा इंडस्ट्रिअल इस्टेटच्या पहिल्या मजल्यावरील दुकान आणि गोदामाला भीषण आग लागली. यामध्ये तेथील काही दुकाने जळून खाक झाली आहेत. पण यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र आगीचे कारण अजूनही समजू शकलेले नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा