Advertisement

जेवणात सापडली पाल, शाळेतील 30 विद्यार्थ्यांची रुग्णालयात धाव

विद्यार्थ्यांना सायन येथील खासगी क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते.

जेवणात सापडली पाल, शाळेतील 30 विद्यार्थ्यांची रुग्णालयात धाव
Representative
SHARES

धारावी येथील कामराज मेमोरियल इंग्लिश हाय अँड ज्युनिअर कॉलेजच्या सुमारे 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झल्याच्या भितीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यान्ह भोजनाच्या वेळी एका विद्यार्थ्याला जेवणात पाल असल्याचे आढळले. त्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना सायन येथील खासगी क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते.

शाहू नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यान्ह भोजन  शाळेने दिले नसून शेजारील एका हॉटेलने दिले होते.

"जे पालक आपल्या मुलांसाठी दुपारचे जेवण आणि नाश्ता बनवू शकत नव्हते त्यांनी त्या हॉटेलशी करार केला होता, जे दररोज शालेय मुलांना दुपारचे जेवण पुरवत होते. त्यात मुख्यतः इडली, सांभर आणि इतर दक्षिण-भारतीय पदार्थ होते," असे एका अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला सांगितले.

बुधवारी मुलांना जेवण दिले जात असताना एका मुलाला सांभारावर एक सरडा तरंगताना दिसला. घाबरलेल्या विद्यार्थ्याने जेवळ बाहेर काढण्यासाठी उलटी करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून इतर विद्यार्थ्यांनीही त्याचीच नक्कल करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले.  विद्यार्थी इयत्ता 5 आणि 6 मध्ये होते. मानक कार्यपद्धतीनुसार, मुलांना अन्न विषबाधा चाचणीसाठी जवळच्या आयुष नावाच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले.

एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही मुलाला अन्नातून विषबाधा झाली नाही, आणि म्हणून त्या सर्वांना त्यांच्या पालकांसह घरी परत पाठवण्यात आले."

"एफडीएने अन्नाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत आणि अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू. आतापर्यंत कोणत्याही पालकांनी आमच्याशी संपर्क साधला नाही किंवा आमच्याकडे कोणतीही तक्रार नोंदवली नाही," असे झोन 5 चे डीसीपी तेजस्वी सातपुते यांनी फ्री प्रेसला सांगितले. .

एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी नमुने गोळा केले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.



हेही वाचा

दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये होणार बदल

घर खरेदी करणाऱ्याच्या तयारीत असणाऱ्या मुंबईकरांनो लक्ष द्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा