Advertisement

मुंबई पोलिसांची आकाश कंदीलवर बंदी

सुरक्षेची खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी दिवाळीच्या काळात आकाश कंदीलांच्या खरेदी-विक्री आणि उडवण्यावर बंदी घातली आहे.

मुंबई पोलिसांची आकाश कंदीलवर बंदी
SHARES

सुरक्षेची खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी (mumbai police) दिवाळीच्या (Diwali) काळात आकाश कंदीलांच्या (sky lanterns) खरेदी-विक्री आणि उडवण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी 23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू असेल.

आकाश कंदील वापरणे मालमत्तेसाठी तसेच लोकांसाठी धोकादायक असू शकते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अखत्यारीतील भागात आकाश कंदील विकणे, खरेदी करणे आणि उडवणे याला सक्त मनाई आहे. सार्वजनिक सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

2015 मध्ये आकाश कंदीलांमुळे आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे मालाड पूर्व येथे 36 मजली इमारतीचे नुकसान झाले होते. यामुळे मुंबईचे माजी अग्निशमन प्रमुख पी रहांगडाले यांनी आकाश कंदिलावर बंदी घालण्याची विनंती केली होती.

शहरातील पेट्रोलियम कंपन्यांजवळ फटाके वाजवण्यास मनाई करणारे आदेशही पोलिसांनी लागू केले आहेत. या आदेशात बॉटलिंग प्लांटच्या 500 मीटरच्या आत फटाके (firecrackers) वाजवण्यास किंवा रॉकेट फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेढ आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आजूबाजूच्या भागांचा समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये माहुलचे टर्मिनल क्षेत्र आणि 15 ते 50 एकर क्षेत्रफळ असलेल्या स्पेशल ऑइल रिफायनरी क्षेत्राचाही समावेश आहे.

दिवाळी हा हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या वर्षी, तो 31 ऑक्टोबर, 2024 रोजी साजरा होणार आहे. फटाके फोडून आणि घरे दिव्यांनी सजवून देशभरात हा सण साजरा केला जातो.



हेही वाचा

प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी बेस्टचा संघर्ष

कोपरी मतदारसंघ स्पॉटलाइटमध्ये

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा