Advertisement

मास्क न घालणाऱ्यांकडून मुंबई पोलिसांनी वसूल केला ४ कोटींचा दंड

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं अनिवार्य आहे. मात्र, अनेक नागरिक याचं पालन करत नसल्याचं आढळून आलं आहे. निर्बंध झुगारणाऱ्या नागरिकांकडून मुंबई पोलिसही दंडवसुली करीत आहेत.

मास्क न घालणाऱ्यांकडून मुंबई पोलिसांनी वसूल केला ४ कोटींचा दंड
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहे. यानुसार, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं अनिवार्य आहे. मात्र, अनेक नागरिक याचं पालन करत नसल्याचं आढळून आलं आहे.  निर्बंध झुगारणाऱ्या नागरिकांकडून मुंबई पोलिसही दंडवसुली करीत आहेत. पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांकडून ४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

 नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यापेक्षा दंडात्मक कारवाईवर पोलिसांनी भर दिला आहे. पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाची निम्मी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जाणार आहे. तर उर्वरित रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा केली जाणार आहे. 

मुंबईत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने क्लीनअप मार्शलच्या मार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, क्लीनअप मार्शलची अपुरी संख्या आणि त्यांना नागरिक जुमानत नसल्याने २० फेब्रुवारीला पोलिसांना दंडवसुलीचे अधिकार दिले. मुंबई पोलिसांनी कारवाईचा धडाका लावत जवळपास महिन्यात २ लाख ३ हजार जणांवर कारवाई करून ४ कोटी रुपये दंड वसुल केला आहे. या रकमेतील ५० टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी तर उर्वरीत रक्कम पालिकेकडे जमा केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी सांगितले.

पोलीस कल्याण निधीचा वापर हा पोलीस आणि त्यांच्या कटुंबियांना आर्थिक मदत, पाल्यांचे शिक्षण, रोजगार तसेच इतर कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी केला जातो.



हेही वाचा - 

सनराईस रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा