Advertisement

मुंबई पोलिसांची 100 हून अधिक पालिका शाळांमध्ये ड्रग्जविरोधी मोहीम

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या गैरवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल शिक्षित करणे आणि त्यांना सुजाण व जबाबदार निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे हा होता.

मुंबई पोलिसांची 100 हून अधिक पालिका शाळांमध्ये ड्रग्जविरोधी मोहीम
SHARES

मुंबई (mumbai) पोलिसांच्या (mumbai police) अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) 12 जुलै रोजी 'ड्रग्ज-मुक्त मुंबई' (Drugs Free Mumbai) या विषयावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली.

या मोहिमेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation)) 100 हून अधिक शाळांमधील 4,000 हून अधिक विद्यार्थ्यांशी एकाच वेळी ऑनलाइन सत्रांद्वारे संवाद साधण्यात आला.

अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देणे आणि त्यांना योग्य व जबाबदार निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-शृंगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, अंमली पदार्थांच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आणि व्यसनाधीनतेकडे नेणाऱ्या परिस्थितींपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश वसंत मोहिते यांनी अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम यांवर भाष्य केले.

अंमली पदार्थांचे व्यसन एखाद्या व्यक्तीचे आरोग्य, नातेसंबंध आणि भविष्य यांवर कसा परिणाम करू शकते, हे त्यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञ अक्षय कुमार एस. शेट यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यास तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना अंमली पदार्थांपासून दूर ठेवून सकारात्मक मार्गाकडे वळवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्यास प्रोत्साहित केले.

या सत्रांदरम्यान, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाचे सामाजिक आणि कायदेशीर परिणाम यांविषयीही माहिती देण्यात आली.

तसेच, योग्य माहिती ठेवणे आणि गरज भासल्यास मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, यावरही भर देण्यात आला.

तसेच, बेकायदेशीर अंमली पदार्थांची विक्री, तस्करी किंवा सेवन यांबाबतची कोणतीही माहिती देऊन या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले.



हेही वाचा

दादरमधील सावरकर मार्केटचे नूतनीकरण होणार

मुंबई: पालिकेच्या नवीन सीबीएसई शाळांना अल्प प्रतिसाद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा