Advertisement

कोरोना, 'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची नियमावली

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनचा धोका लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे.

कोरोना, 'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची नियमावली
SHARES

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनचा धोका लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. लसीकरणाच्या मोहिमेसह अनेक सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. शिवाय, प्रचंड घाई आता महापालिकेकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच आता मुंबई पोलीस ही सतर्क झाले असून, त्यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत.

भारतात ऑमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानं राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात ऑमिक्रॉनचे ४ रुग्ण आढळल्यानं मुंबई पोलिसांनी कोरोना आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.

मुंबई पोलिसांच्या निर्बंधांनुसार कोविड नियमांचे काटेकोट पालन करण्याचं आवाहन सर्व मुंबईकरांना केलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं निर्बंध आखून दिले होते. त्याचे पालन होतंय की नाही हे मुंबई पोलिसांकडून तपासलं जाणार आहे.

मुंबई पोलिसांचे निर्बंध

  • सर्व व्यक्ती ज्या एखाद्या कार्यक्रमाशी, सेवेशी निगडीत आहेत. आयोजक, सहभागी असणारे, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे पूर्णपणे लसीकरण असायला हवे.
  • कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेलं हवं.
  • अभ्यागत, ग्राहक यांचंही लसीकरण झाले पाहिजे.
  • मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेनं प्रवास करणाऱ्या व्यक्तींचं लसीकरण झाले असावे.
  • पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी.
  • महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणी वैध असेल.
  • कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागेल.

मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबईतील सुमारे ५ लाख नागरिकांनी दुसऱ्या डोसची मुदत चुकवली असल्याचे समोर आले आहे. दोन्ही डोस घेतल्यास कोविडचा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे दुकान, मॉल आदी ठिकाणी दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसमध्ये प्रवेश देण्याचा नियम करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रम मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे. बेस्ट बसमधून दररोज २८ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

गर्दीच्या वेळेत प्रत्येक बस प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रत्येकाचे प्रमाणपत्र तपासणे बस वाहकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा