Advertisement

दादर परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी, आतापर्यंत ६० जणांवर कारवाई

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे.

दादर परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी, आतापर्यंत ६० जणांवर कारवाई
SHARES

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. तसंच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासावेळी स्टिकरचा वापर करण्यास सांगितलं आहे. मात्र काही कारण नसतानाच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळं या नागरिकांवर मुंबईतील दादर परिसरात लावण्यात आलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी कारवाई केली आहे. आतापर्यंत ६० जणांवर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळं निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. शिवाय केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासास परवानगी असून सर्वसामान्यांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र तरीही अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. आशा नागरिकांनाविरोधात पोलिसांनी कडक करवाई करण्यास सुरुवात केली आहे.

कोविड-19 चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील.

परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. हे बदल २२ एप्रिल संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा