Advertisement

'हेलो फ्रेंडस् हेल्मेट पहन लो' मुंबई पुलिसांचं अनोखं ट्वीट


'हेलो फ्रेंडस् हेल्मेट पहन लो' मुंबई पुलिसांचं अनोखं ट्वीट
SHARES

सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आधी ढिंचॅक पूजा त्यानंतर डांसिंग अंकल आणि आता हेलो म्हणणारी आंटी. या व्हिडिओत हेलो फ्रेंडस् म्हणत चहा प्यायला सांगणारी आंटी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आता याच मीम्सचा आधार घेत हेल्मेट पेहन लो असं अनोखं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे.


 सोमवती महावर उर्फ 'पापेवाली' या फेसबुक यूझरचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि 'हेलो फ्रेण्ड्स चाय पी लो' या टॅगलाईनचा आधार घेत अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. मुंबई पोलिसांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत 'हेलो फ्रेण्ड्स.. हेल्मेट पेहन लो.. टू हॅव अ 'सेफ-टी' अॅट होम' असं आवाहन नागरिकांना केलं आहे.


मुंबई पोलिसांचं आवाहन

विशेष म्हणजे मुंबई पोलिस मागील अनेक महिन्यांपासून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओजच्या सहाय्याने नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणारे संदेश देत आहे. अशातच आता दुचाकीस्वारांना हेल्मेटचं महत्त्व समजावं यासाठी त्यांनी अनोख्या पद्धतीने आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे.

यापूर्वी 'रेस 3' मधील डेझी शाहच्या 'अवर बिझनेस...', 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही' या मीम्सवरून मुंबई पोलिसांनी ट्वीट केलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा